या घटनेत एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला आधी एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे गेल्यावर कळा थांबल्याने महिलेला पुन्हा घरी पाठवण्यात आले. रात्री उशिरा महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंबीय तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाले. घाटी रुग्णालय येईपर्यंत महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या. शेवटी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. लिफ्टजवळच महिलेला प्रसूती झाली आणि नवजात बालक जमिनीवर पडले. यात त्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला.