वर्षा गायकवाड यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

मंगळवार, 25 जून 2024 (09:45 IST)
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणनीती बनवण्यास सर्व पक्षांनी सुरुवात केली आहे. दरम्यान मुंबईतून काँग्रेसमध्ये मतभेदाचे वृत्त समोर आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे.

काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी मंगळवारी (25 जून) महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत, जिथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल. मात्र त्याआधीच राज्यातील 16 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहून मुंबई पक्षाच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या 16 ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून मुंबई पक्षाच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे. 

पक्षाच्या 16 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय सुधारण्यासाठी आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहर युनिटच्या स्थानिक समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत चर्चा करण्याची विनंती केली आहे.
पक्षनेत्यांनी लिहिलेल्या पत्रात या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी वर्षा गायकवाड यांची बदली करण्यात यावी, असे म्हटले आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती