सरकारकडून पोलीस महासंचालक पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ

बुधवार, 9 जानेवारी 2019 (09:01 IST)
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा सेवाकाल राज्य सरकारने नियमानुसारच वाढवला असून तसे अधिकार राज्य सरकारला आहेत. तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला. दत्ता पडसलगीकर यांना जून 2020 पर्यंत पोलिस महासंचालकपदी कायम ठेवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. याची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटीलआणि न्यायमूर्ती एन. एम. जमादार  यांच्या खंडपीठाने घेऊन याचिकेची सुनावणी 9 जूनपर्यंत तहकू ब ठरवली.
 
पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांना शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. नोव्हेंबर अखेरीस  आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर आता राज्य सरकारने पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती