वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असून गुजरात राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 13 जून रोजी पोरबंदर आणि कच्छ येथे वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथून 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
वायू चक्रीवादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. वायू चक्रीवादळाचा प्रभाव गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, सह अनेक जागी दिसून येण्याची शक्यता आहे.