चिपळूण मध्ये कोव्हीड रुग्णालयात पाणी भरले,8 रुग्णांचा मृत्यू

शुक्रवार, 23 जुलै 2021 (17:21 IST)
सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान मांडले आहे.शुक्रवारी महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये पूर आला आणि जागो जागी पाणी साचले आहे.अशा परिस्थितीत चिपळूण मध्ये एका कोविड रुग्णालयात पाणी साचले आणि यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि त्यामुळे 8 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला.
 
प्राथमिक माहितीनुसार चिपळूण मध्ये पूर आल्यामुळे  एका कोव्हीड रुग्णालयात पाणी भरण्याच्या घटनेमुळे रुग्णालयाचे व्हेंटिलेटर बंद पडले  आणि या अपघातात 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.सध्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पूर आला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना आपले जीव वाचविण्यासाठी अडचणींना सामोरी जावे लागत आहे.
 
दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये दरड कोसळल्याने 36 जणांचा मृत्यू झाला आहे.एनडीआरएफ आणि नेव्ही दल महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील मदत कार्यात सहभागी आहेत.लोकांना वाचविण्याचे प्रयत्न जोमाने सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती