कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू- छगन भुजबळ

शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (08:55 IST)
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी वेगळा मानतच नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी हे एकाच विचारांवर चालणारे पक्ष असून ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन पक्षांची बांधणी करावी आणि आगामी लोकसभेची निवडणूकी बरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निवडणूक आण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी कॉंग्रेस कमिटी कार्यालयात भेट देवून कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार समीर भुजबळ हे ही उपस्थित होते.यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. विलास बच्छाव, आदी उपस्थित होते.यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधानाला मानणारे आणि हुकूमशाहीला विरोध करणारे पक्ष आघाडीसोबत येत आहे. देशभरात भाजपला सत्तेतून घालून लावण्यासाठी देशभरात विविध राज्यात आघाडी केल्या जात आहे. नक्कीच निवडणुकीत आघाडीला यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  बूथ कमिट्या तयार झाल्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे गावागावातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गावपातळीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती