जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे UPSC परीक्षेत उत्तीर्ण

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:43 IST)
युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या 338 व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे.दिव्या गुंडे हिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दिव्याने ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा दिली होती.
 
21 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली येथे दिव्याची मुलाखत झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी निकाल जाहीर केला असून यामध्ये दिव्याने 338 व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे.येत्या काही दिवसांमध्ये आयोगामार्फत पदस्थापना मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर याची माहिती समजताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिव्या गुंडे आणि तिची आई जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले.
 
दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय आई नयना गुंडे आणि वडिल अर्जुन गुंडे यांना दिले आहे.तसेच या यशामध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक, शिक्षक व मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिव्याने सांगितले.तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्यामार्फत तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती