विशेष म्हणजे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे खंदे समर्थक असलेले राजुदास जाधव यांच्या गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय .सहकार पॅनलचे प्रमुख राजुदास जाधव यांचा परिवर्तन पॅनल चे संयोजक पप्पू पाटील भोयर यांनी 904 मतांनी पराभव केला आहे तर परिवर्तन पॅनल चे मधुकर काठोडे यांना 3223 मते मिळाली त्यांच्या पॅनल चा हा सर्वांत मोठा विजय मानला जातोय .राजुदास जाधव हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुध्दा आहेत . सहकार पॅनल पराभव कशामुळे झाला याची चर्चा आज जिल्हा परिषदेच्या परिसरात रंगली होती .