बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू संपासिंह थापा यांनी मातोश्रीची साथ सोडली आहे. सोमवारी सायंकाळी ते ठाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात शिंदे गटात सामील झाले. अनेक दशकांपासून शिवसेना जवळून पाहणाऱ्यांना थापा यांचं मातोश्रीतून बाहेर पडणं निराशाजनक वाटू शकतं. थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत प्रिय आणि निष्ठावंत मानले जात होते. थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचे केवळ सर्वात विश्वासू मदतनीस नाही तर ते ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणूनही ओळखले जात होते.