वाय कॅटेगरीच्या सुरक्षेत बाबा सिद्दिकीची हत्या झाली, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

रविवार, 13 ऑक्टोबर 2024 (15:08 IST)
एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री अज्ञात हल्लेखोऱ्यांनी गोळी झाडून हत्या केली. या वरून विरोधकांनी राज्यसरकारला घेरले आहे. विरोधक सातत्याने शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहे. 

या वर शिवसेने उबाठाचे नेते संजय राऊतांनी देखील शिंदे सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सिद्दीकी यांना वाय श्रेणीची सुरक्षा देऊन देखील हत्या केली. हे शिंदे सरकारचे अपयश आहे. 

राज्यात पूर्वी कायदा आणि सुव्यवस्था चांगली होती. त्यामुळे मोठे उद्योग देखील महाराष्ट्रात आले. 
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांचा ज्या प्रकारे वापर केला आहे. त्यामुळे आता पोलिस आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. दिवसाढवळ्या केव्हाही खुनाच्या घटना घडत आहेत.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा.तसेच मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा आणि देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून काढावे.
 
बाबा सिद्दीकीसारखी व्यक्तीही महाराष्ट्रात सुरक्षित नाही : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष पटोले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. बाबा सिद्दीकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगून महाराष्ट्र सरकारने गुन्हेगारांना दिलेल्या पाठिंब्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा सिद्दीकी यांच्यासारखी व्यक्तीही महाराष्ट्रात सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती