बदलापूरच्या शालेयमुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळत आहे. बदलापूरच्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी या साठी लोक आंदोलन करत आहे. यावर अजित पवारांची प्रतिक्रिया आली आहे. यवतमाळमध्ये महिलांसाठी महायुती सरकारच्या प्रमुख 'लाडकी बहिन' योजनेबाबत बोलताना ते म्हणाले,की,राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सरकार महिलांवरील गुन्ह्यातील आरोपींना सोडणार नाही.
अजित पवार म्हणाले, "आमच्या मुलींवर हात ठेवणाऱ्यांवर कायद्याचा एवढा रोष दाखवायला हवा की, ते दुसऱ्यांदा विचारही करणार नाहीत. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे गुप्तांग कापायला हवे, जेणेकरून गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये.
अशा गुन्हेगाऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. शक्ती कायदा लवकरच लागू व्हावा या साठी प्रयत्न सुरु असून राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर हा कायदा लागू करण्यात येईल. आरोपी कोणीही असो, राजकीय नेत्याशी पक्षाशी संबंधित असला तरीही त्याला कडक शिक्षा दिली जाईल त्यांचे गुप्तांगच छाटले पाहिजे जेणे करून पुढे असे प्रकरण घडणार नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी पुण्यात बदलापूर घटनेच्या विरोधात हातावर काळ्या फिती लावून निषेध केला. या आंदोलनात शरद पवार म्हणाले, असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी महिलांवर अत्याचार होत नाही.