हनुमान दर्शनाला निघालेल्या 4 भाविकांचा अपघाती मृत्यू

शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (11:53 IST)
काळ कधी कुठे कसा झडप घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. हिंगोलीत माळ हिवरा येथे देवदर्शनासाठी  जाणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातल्याची घटना घडली भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने चिरडल्याची घटना हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात ही घटना घडली असून हिंगोली वाशीम रोड वरून माळहिवरा फाटी वरून हे भाविक पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले.  

जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमी भाविकांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला नांदेड च्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पिकअप चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर वाहन चालकाला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती