ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण

शुक्रवार, 10 मे 2019 (10:01 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील ऑनर किलिंग प्रकरणात आता पतीनेच पत्नीला मारल्याचं बोललं जातंय. मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा जबाब घरातील सदस्य असलेल्या चिमुकल्या सहा वर्षीय साक्षीदाराने दिलाय. रुख्मिणीच्या सहा वर्षीय भावाच्या जबाबामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळाल आहे.
 
जबाबानुसार, मंगेश हा पत्नी रुख्मिणीला मारहाण करत होता, असं तिच्या आईने सांगितलंय. त्यामुळे रुक्मिणी ही आपल्या आई-वडिलांच्या घरी आली होती. मंगेश घरी येऊन रुख्मिणीला मारेल या भीतीने तिच्या आईने तिला आणि तिच्या बहीण-भावाला घरात कोंडून ठेवलं होतं. त्याच वेळी मंगेश घराच्या मागील भागातून घरात आला आणि त्यानेच पत्नी रुख्मिणीला पेट्रोल टाकून पेटून दिल्याचं छोट्या भावाने सांगितल आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती