नाशिकात पेट्रोल पंपावर बुलेटने पेट घेतला , मोठा अनर्थ टळला

रविवार, 28 ऑगस्ट 2022 (13:51 IST)
अनेकदा रस्त्यावर वाहन चालताना गाडीने पेट घेतल्याची किंवा पेट्रोल पंपावर वाहनाने पेट घेतल्याची घटना घडल्याचे वृत्त ऐकायला मिळते.अशीच एक घटना नाशिकच्या येवला येथील एका पेट्रोल पंपावर बुलेटने पेट घेतल्याची घडली आहे. वेळीच पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टाळता आला. 
 
पेट्रोल पंपावर एका बुलेट मोटर सायकल स्वार पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याच्या गाडीने एकाएकी पेट घेतला त्यावेळी या वाहनावर दोन लोक बसले होते. गाडीने पेट घेतातच त्यांनी गाडी कडेला उभी केली आणि गाडीपासून लांब जाऊन उभे राहिले. अचानक लागलेल्या आगीत वाहन पेटू लागले. या घटनेमुळे पंपावर खळबळ उडाली. वाहनाने पेट घेतला पाहून पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे पेट्रोल पंपावरील मोठा अनर्थ होण्यापासून टाळला गेला. या आगीत बुलेट पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण थरार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती