भीषण अपघात, तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 6 भाविकांचा मृत्यू

नांदेड- तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याने सहा जण ठार झाल्याची माहिती आहे.
 
मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील भाविकांच्या क्रुझर जीपला आंध्र प्रदेशातील शाबादवाडी जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात किमान सहा जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जीपमध्ये एकाच कुटुंबातील 20 ते 22 जण प्रवास करत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती