राज्यात ६ हजार ३९७ नवीन करोनाबाधित आढळले

मंगळवार, 2 मार्च 2021 (07:33 IST)
राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील तीन दिवसातील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्या वर आढळून आल्यानंतर सोमवारी यामध्ये काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले. शिवाय करोनातून बरे होणाऱ्यांची संख्येत देखील वाढ दिसत आहे. सोमवारी  राज्यात ६ हजार ३९७ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याशिवाय राज्यात ३० रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
 
राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती गृहविलगीकरणात  आहेत, तर ३,४८२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच,  राज्यात  एकूण ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती