समृद्धी महामार्गावर अपघातात 12 जणांचा दुर्देवी मृत्यू

शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (14:31 IST)
समृद्धी महामार्गावर लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पालटून अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या अपघातात 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून काही मजुरांना घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर जातात असताना या ट्रक चा तळेगाव येथे अपघात झाला.या ट्रक मध्ये एकूण 15 मजूर होते.त्यात 12 मजूर मृत्युमुखी झाले.काही मजूर जखमी झाले आहेत.त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
सध्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगानं सुरू आहे.लवकरच हा संपूर्ण माहामार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे.यासाठी संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी काम सुरु असताना तळेगाव येथे हा अपघात झाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती