“हे बंड नाही, ही गद्दारी नाही, ही खुद्दारी आहे : विजय शिवतारे

शनिवार, 16 जुलै 2022 (21:07 IST)
माजी आमदार विजय शिवतारे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत नावाच्या माणसानं शिवसेनेची तारांबळ करून टाकली, असं त्यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवतारे म्हणाले की, “हे बंड नाही, ही गद्दारी नाही, ही खुद्दारी आहे. आम्ही उद्धवसाहेबांना कधीही डावलेलं नाही. आम्ही उद्धवसाहेबांना मानतो, आदित्य साहेबांना देखील तेवढंच मानतो. पण संजय राऊत नावाच्या माणसानं शिवसेनेची तारांबळ करून टाकली आहे. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा एक मनोविकार झाला आहे. हा विकार सामान्य माणसाला होत नाही, अतिहुशार माणसालाच होतो, असं डॉक्टर सांगतात. अशा व्यक्तीला वेगवेगळे भास होत असतात, त्याला जे भास होतात, ते सर्व खरंच आहेत, असं त्याला वाटायला लागतं.”
 
सुरुवातीला त्यांना भास झाला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. गोव्यात आपलं सरकार येणार आणि तिथेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हा त्यांना (संजय राऊतांना) झालेला दुसरा भास होता. त्यावेळी राऊत आदित्यदादाला घेऊन तिकडे (गोव्याला) गेले, भाषणं वगैरे करायला लावली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, आमची लढाई शिवसेनेशी नाही, शिवसेनेची लढाई नोटासोबत  आहे,” असंही शिवतारे म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती