रुसवे, फुगवे, कोंडी, चर्चेचे गुर्हाळ यातून बाहेर पडत भाजपा आणि शिवसेनेचे ‘हम साथ साथ है’चा नारा दिला असल्याचे संकेत ‘मातोश्री’वर मिळाले आहेत.
शिवसेनेच्या सत्तेत सहभागाबद्दल भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी, सुभाष देसाई तसेच उध्दव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असातानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तोडगा निघणार असल्याचे वतव्य केल्याने सेनेच्या अटी भाजपाने मान्य केल्याचे दिसून येत आहे.