खंजिराची भाषा करताना सांभाळून बोला - संजय राऊत

गुरूवार, 26 मे 2022 (10:41 IST)
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिला. यावरून मराठा संघटना शिवसेनेवर नाराज झाल्या आहेत.
 
"शिवसेनेने संभाजीराजेंच्या पाठीत खुपसला, अशी टीका मराठा संघटना करत आहेत. याच संघटनांच्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
 
'खंजिराची भाषा नको, बोलताना जरा सांभाळून बोला. आम्ही आमच्या वाटणीची जागा छत्रपतींना देऊ केली होती, आणखी काय करायला हवं होतं?' असा सवाल राऊत यांनी मराठा संघटनांना केला आहे.
 
"आम्ही स्वत: शिवसेनेची एक जागा जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्या जागेवर उमेदवार म्हणून छत्रपतींना संधी द्यायला तयार होतो. छत्रपतींनी ती संधी घ्यायला हवी होती.
 
"संभाजीराजेंनी याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांनाही राजकीय पक्षांची मजबुरी काय असते ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये," असं संजय राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती