पुण्यातील आणखी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूची लागण, रुग्णांची संख्या 15 वर

बुधवार, 10 जुलै 2024 (10:00 IST)
सध्या पुण्यात झिका व्हायरसचे प्रकरण वाढत आहे. पुण्यातील आणखी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूची लागण लागल्याचे आढळून आले आहे. सध्या पुण्यात हा संसर्ग झपाट्याने पसरत असून गेल्या आठवड्यात नऊ प्रकरणांची नोंद झाली होती. पुणे महानगरपालिकाने 109 नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असून त्यापैकी 16 नमुने गर्भवती महिलांचे होते. 

आणखी दोन महिलांना या विषाणूंची लागण लागली असून एक महिला सिंहगड रोड परिसरात राहत असुंती महिला 12 आठवड्यांची गरोदर आहे. तर दुसरी महिला 7 आठवड्यांची गरोदर आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. या व्यतिरिक्त एका पुरुषांमध्ये झिका व्हायरसची पुष्ठी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना गर्भवती महिलांच्या संसर्गाचे परीक्षण करून आणि झिका ची लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवायला सांगितले आहे. तसे आरोग्य सुविधा आणि रुग्णालयांना कॅम्पस एडिस डासांपासून मुक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, देखरेख आणि कारवाई करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. 
 
हा विषाणू संक्रमित एडीस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो, ज्याला डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारखे संक्रमण पसरवण्यास देखील ओळखले जाते 1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती