राज्यात झिका व्हायरसचे तीन नवीन रुग्ण आढळले असून आता रुग्णांची संख्या 12 झाली आहे. पुणे महापालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राज्यात झिका व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता इतर राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी एक सल्लागार जारी केला होता. आणि परिस्थतीतवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
झिका विषाणूचा संसर्ग एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाही होतो. झिका संसर्गामुळे मृत्यू होत नसला तरी, संक्रमित गर्भवती महिलेच्या बाळाला 'मायक्रोसेफली'ची समस्या असू शकते, ज्यामध्ये त्याच्या डोक्याचा आकार तुलनेने लहान होतो.