राज्यात सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहे. सध्या जुन्या पेन्शन योजने संप मुळे पेपर तपासणीच्या कामात विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली असून इयत्ता दहावीचा निकाल 10 जून पर्यंत तर इयत्ता बारावीचा निकाल 2 जून पूर्वी लागणार असे सांगितले आहे.
दहावी बारावीचा निकाल वेळेतच जाहीर व्हावा या साठी महाराष्ट्र बोर्डाने तयारी सुरु केली आहे. निकालाला उशीर होऊ नये या साठी बोर्डाचे काम सुरु झाले आहे. सध्या राज्यात H3N2 चे प्रकरण वाढत असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या अडचणींमुळे परीक्षा देता आली नाही त्यांचे वर्ष वाया जाऊ नये या साठी त्यांची पुरवणी परीक्षा जून अखेरीस घेतली जाणार आहे.