तसेच एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, संध्याकाळी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील खेड-शिवपूर प्लाझाजवळ पोलीस नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी साताऱ्याकडे जाणारी एक कार थांबवण्यात आली. झडतीदरम्यान वाहनात बसलेल्या चौघांकडून 5कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कारमधील चालकासह चौघांची चौकशी करण्यात आली. ही रोकड पुढील तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.