नगर जिल्ह्यातून पुण्याला जात असेल तर महामार्गावरील वाहतुकीत बदल

मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (08:28 IST)
1 जानेवारी 2022 रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त 31 जानेवारी सायंकाळी सात वाजल्या पासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे. याशिवाय अभिवादनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासासाठी वळविण्यात येणार आहे.
 
आशा प्रकारे वाहतूक वळविण्यात आली आहे. 1) पुण्याहून नगर कडे जाणारी जड वाहतूक खराडी बायपास मार्गे केडगाव – चौफुल – न्हवरा – शिरूर मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. 2) सोलापूरहुन चाकण कडे जाणारी वाहतूक खराडी बायपास मार्ग विश्रांतवाडी – आळंदी – चाकण मार्गे वळविण्यात येणार आहे.3) मुंबईहून नगरकडे जाणारे जड वाहतूक वडगाव मावळ – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव आळेफाटा – नगर 4) मुंबई हुन नगर कडे जाणारी जड वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूर मार्ग नगर येथे वळविण्यात येणार आहे.
अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध ठिकाणी वाहनानुसार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पार्किंग स्थळापासून विजयस्तंभ पी एम टी बस ची सोय करण्यात आली आहे.पार्किंग स्थळे पुढील प्रमाणेपुण्याहून येणाऱ्या
वाहनांसाठी ( कार ) * लोणीकंद येथील आपले घर शेजारी हनुमंत कंद यांची मोकळी जागा.* लोणीकंद येथील आपले घर शेजारी संदीप सातव यांची मोकळी जागा.* लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांची मोकळी जागा* तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारील मोकळी जागा.बस साठी – आपले घर सोसायटी मागील बाजू.
आळंदी कडून येणाऱ्या वाहनांसाठी* तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे* तुळापूर रोड वाय पॉईंट शेजारील मोकळी जागाथेऊर केसनंद कडून येणाऱ्या वाहनासाठी –* सोमवंशी अकादमी समोरील मोकळी जागा* खंडोबाचा माळ.अष्टापूर, डोंगरगाव,
 
पेरणेकडून येणाऱ्या वाहनासाठी* पेरणे गाव छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा समोरील मोकळी जागादुचाकी साठी पार्किंगटाटा मोटर्स समोरील मोकळे मैदान.ज्योतिबा पार्क गो शाळा शेजारील मैदान.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती