पुणे : आयटी आणि त्याशीसंबंधीत क्षेत्राकरीता मागणीत असणाऱया पुण्यात गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी नुकतीच सुमारे 12 एकर जागा खरेदी केली असल्याची माहिती आहे. सदरची जागा पुण्यातील वाघोली येथे रहिवासी विकासासाठी खरेदी करण्यात आली असून यातून 2 हजार कोटीचा महसूल मिळणार असल्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. सदरच्या जागेकरीता किती रक्कम मोजली आहे याचा खुलासा मात्र कंपनीने केलेला नाही.