सानिया पहिल्‍या 50 मधून बाहेर

वार्ता

सोमवार, 4 ऑगस्ट 2008 (18:31 IST)
ND
नवी दिल्ली- ऑलंम्पिक खेळांमध्‍ये भारतीय टेनिसला मोठया अपेक्षा असलेली सानिया मिर्झा महिला जागतिक क्रमवारीत पहिल्‍या 50 मधून बाहेर पडली असून तिच्‍या या खराब फॉर्ममुळे तिचे संघ व्‍यवस्‍थापक चिंतित झाले आहेत.

सानिया गेल्‍या सोमवारी आपल्‍या जागतिक क्रमवारीतून 35 व्‍या स्‍थानावरून 50 व्‍या क्रमांकावर येउन पोचली आहे. तिच्‍या या खराब फॉर्ममुळे ती स्‍टाकहोम स्‍पर्धेतूनही बाहेर पडली आहे.

ताज्‍या क्रमवारीत सानिया आणखी 10 स्‍थानांनी घ्‍सरली असून 60 व्‍या क्रमांकावर पोचली आहे. येत्‍या आठ ऑगस्‍टपासून बिजींगमध्‍ये होत असलेल्‍या ऑलंम्पिक खेळांमध्‍ये सानियाकडून भारताला मोठया अपेक्षा आहेत. सानियाला ऑलंम्पिकमध्‍ये वाईल्‍ड कार्डव्‍दारे प्रवेश देण्‍यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा