Realme Freedom Sale सुरु, स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (08:50 IST)
स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme ने फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर Realme Freedom Sale आयोजित केला आहे. 1 ऑगस्टपासून 3 ऑगस्टपर्यंत हा सेल सुरू असणार असून यादरम्यान कंपनीच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स आहेत. याशिवाय कंपनी या सेलमध्ये रियलमी 3 या स्मार्टफोनचं रेड कलर व्हेरिअंट देखील लाँच करणार आहे.
 
रियलमी 3 प्रो –
या सेलमध्ये रियलमी 3 प्रो या स्मार्टफोनवर 1,000 रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटवर ही ऑफर लागू असणार आहे. या सेलमध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंट 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 6GB + 64GB व्हेरिअंट 14,999 रुपये आणि 6GB/128GB व्हेरिअंट 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
 
रियलमी 2 प्रो –
या स्मार्टफोनवर सेलमध्ये 500 रुपये डिस्काउंटची ऑफर आहे. डिस्काउंटनंतर या फोनचं 4GB/64GB व्हेरिअंट 10,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 
रियलमी C2 –
सेलमध्ये रियलमी C2 या स्मार्टफोनवर देखील डिस्काउंट मिळतंय. यातील 2GB/16GB व्हेरिअंट 5,999 रुपये, 2GB/32GB व्हेरिअंट 6,999 रुपये आणि 3GB/32GB व्हेरिअंट 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
 
रियलमी 3 डायमंड रेड कलर व्हेरिअंट –
या सेलमध्ये रियलमी 3 चं डायमंड रेड कलर व्हेरिअंट 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या किंमतीत तुम्ही 3GB/32GB व्हेरिअंट खरेदी करु शकतात. तर 3GB/64GB व्हेरिअंट 9,999 रुपयांमध्ये आणि 4GB/64GB व्हेरिअंट 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. नवं व्हेरिअंट आजपासून सर्व ऑफलाइन स्टोअर्सवर देखील उपलब्ध होणार आहे.
 
रियलमी X स्मार्टफोनचं ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ हे व्हेरिअंट फ्लिपकार्टवर आजपासून 20,999 रुपयांमध्ये मिळेल. 3 ऑगस्टपासून या फोनचे सर्व व्हेरिअंट्स दुकानांमध्येही उपलब्ध असणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती