एमआयला टक्कर सॅमसंग ने केली या सर्व फोनचे किंमत कमी

बुधवार, 31 जुलै 2019 (08:53 IST)
सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Mi ने आपले फोन बाजारात उतरवल्याने सॅमसंग समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परंतू दक्षिण कोरियाच्या या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता सॅमसंग कंपनीने आपले २ फोन कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंग आपल्या चांगल्या प्रोडक्टमुळे ओळखली जाते. सॅमसंगचे फोन बरेच महाग असतात. परंतू आता सॅमसंगने आपली परवडणाऱ्या किंमतीची सीरीज सुरु केली आहे. आता सॅमसंगने आपले दोन महागड्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. 
 
स्मार्ट फोन आहेत 
सॅमसंग गॅलेक्सी A7 आणि दुसरा सॅमसंग गॅलक्सी A9 यांचा सहभाग आहे.मागील आठवड्यात सॅमसंगने भारतात गॅलेक्सी A10, A20, A30 ची किंमत कमी केली आहे. आता भारतात गॅलेक्सी A9 (२०१८) च्या किंमतीत कपात होण्याची वेळ आली आहे. गॅलक्सी A7 (२०१८) ४ जीबी रॅमची किंमत आता १५,९९० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम मॉडेलबरोबर १९,९९० चा प्राइस टॅग आहे. दुसरीकडे गॅलक्सी A9 (२०१८) च्या ६ जीबी रॅमच्या बेस मॉडेलची किंमत २५,९९० आहे तर ८ जीबी रॅम साठी टॉप-एंड वेरिएंटची किंमत आता २८,९९० आहे.जर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ इच्छितात. तर हे दोन स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. सॅमसंग गैलेस्की A7 आणि दुसरा सॅमसंग गॅलेक्सी A9 स्मार्टफोन तुम्हाला देशातील ऑनलाइन स्टोअ‍रवर म्हणजेच अ‍ॅमेझानवर फ्लिपकार्टवर नव्या किंमतीत उपलब्ध होईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती