चार कॅमेर्‍यासह हा फोन खरेदी करा 10,000 रुपयांहून कमी किमतीत, 20 ऑगस्टला होणार लाँच

आता भारतात एक शानदार स्मार्टफोन लाँच होणार आहे ज्यात चार कॅमेरा असतील. 5000एमएएच ची बॅटरी आणि किंमत 10,000 रुपयांहून कमी. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल...
 
Oppo चा सब-ब्रँड रिअलमी 20 ऑगस्ट रोजी आपले दोन स्मार्टफोन प्रस्तुत करणार आहे. ज्यात Realme 5 आणि Realme 5 Pro सामील आहे. रिअलमी इंडियाने या बातमीची पुष्टी केली आहे. रिअलमी 5 आणि रिअलमी 5 प्रो मध्ये क्वॉड (चार) कॅमेरे मिळतील.
 
Realme 5 चार कॅमेर्‍यांसह 10,000 रुपयांहून कमी किमतीत भारतात विकला जाणारा पहिला स्मार्टफोन असेल. अर्थात रिअलमी 5 एक बजेट स्मार्टफोन असणार.
 
रिअलमी 5 च्या प्रोसेसरबद्दल सांगितले तर या फोनमध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर मिळेल. या प्रोसेसरसह भारतात अजून कोणातही स्मार्टफोन आतापर्यंत लाँच करण्यात आलेला नाही. शाओमी एमआय ए3 ला 21 ऑगस्ट रोजी भारतांत स्नॅपड्रॅगन 665 सह लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
रिअलमीच्या या दोन्ही स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टद्वारे होणार. तसेच Realme 5 Pro मध्ये सोनी IMX586 48MP सेंसर असेल. या फोनमध्ये 119 डिग्री वाइड एंगल असलेला लेंस देखील मिळेल. तसंच Realme 5 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर मिळण्याची आणि यात VOOC 3.0 फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Realme 5 मध्ये 5000mAh बॅटरी असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती