मुस्लिम महिलांना मशिदीत सर्वांसह नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका पुण्यातील बोपोडी येथील रहिवासी यास्मीन झुबेर अमहद पीरजादे व त्यांचे पती झुबेर अहमद नाझीर अहमद पीरजादे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली असून या याचिकेवरून कोर्टाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला नोटीस जारी करत त्यावर उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रतिज्ञापत्रावर आपली बाजू मांडताना ऑल इंडिया मुस्लि पर्सनल लॉ बोर्डाने वरील भूमिका स्पष्ट केली.
कोणत्याही धर्माच्या प्रथापरंपरांबाबत चौकशी करण्याची मुभा दिली जाऊ नये, असे नमूद करतानाच मलांना मशिदीत सर्वांसह नमाज अदा करणे बंधनकारक नाही, याकडे बोर्डाने लक्ष वेधले. त्याचवेळी मुस्लिम महिला मशिदीत जाऊन नमाज अदा करण्यासाठी मात्र स्वतंत्र आहे, असे बोर्डाने अधोरेखित केले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर 2018 रोजी एकआदेश देऊन केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला होता.