उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात मानवभक्षक लांडग्यांनी दहशत पसरवली आहे. तसेच जुलै महिन्यापासून गेल्या सोमवारपर्यंत लांडग्यांनी सात मुलांसह एकूण आठ जणांचा बळी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आईसोबत झोपलेल्या मुलांनाही लांडगे नेऊन खाऊन टाकतात. लांडग्याच्या हल्ल्यात आतापर्यंत महिला, लहान मुले आणि वृद्धांसह सुमारे 36 जण जखमी झाले आहेत. हे लांडगे बदला घेण्याच्या उद्देशाने बहराइचवर हल्ला करत असावेत, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लांडगे बदला घेणारे आहेत-
बहराइच, यूपीमध्ये वाढत्या लांडग्यांच्या हल्ल्यांसाठी प्रभावित भागात नेमबाजांना तैनात करण्यात आले आहे.तसेच तज्ज्ञांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लांडगे हे सूड घेणारे प्राणी आहेत आणि भूतकाळात मानवाने त्यांच्या शावकांना इजा केल्याचा बदला म्हणून लांडगे हे हल्ले करत असावेत. भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेले आणि बहराइच जिल्ह्यातील कटरनियाघाट वन्यजीव विभागातील माजी वन अधिकारी ज्ञान प्रकाश सिंह यांनी ही माहिती दिली आहे.