मजुराच्या मुलीने प्रामाणिकपणे 7 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग परत केली

मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (17:02 IST)
आजच्या काळात प्रामाणिक पणा दिसत नाही, पण मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील उदयपुरा येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मजुराच्या मुलीने  प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. रीना असे या मुलीचे नाव आहे.  वाटेत तिला सात लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग सापडली. ती बॅग तिने आपल्या वडिलांसोबत येऊन  पोलिस ठाण्यात जमा केली. ही बॅग दागिन्यांच्या मूळ मालकाला परत करण्यात आली आहे, ज्याने मुलीला 51,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले . 
 
ही घटना 20 फेब्रुवारीची आहे. यशपाल पटेल रहिवासी काकरुआ यांच्या मुलीची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग रस्त्यावर पडली होती. ही बॅग उदयपूर येथील  मजूर मंगल सिंग यांची मुलगी रीना हिला सापडली. ती बराच वेळ वाट पाहत होती  की कोणी तरी ही बॅग घेण्यासाठी येतील. कोणी न आल्याने ती बॅग उचलून घरी गेली. तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली. रीनाचे वडील मंगल सिंह यांनी ही बॅग घेऊन परिसरातील आदरणीय डॉ. मोहनलाल बडकूर यांच्या घरी नेली. तेथून पोलिसांना माहिती देण्यात आली. यादरम्यान यशपाल पटेल यांची मुलगी घरी पोहोचली तेव्हा बॅग पडल्याचे तिला समजले. त्यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यासोबतच बॅग हरवल्याचा संदेशही व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आला. 
 
कोणीही न आल्याने दागिन्यांची बॅग घरी घेऊन आलेल्या रीनाने शेतातून परतत असताना वाटेत तिला बॅग सापडल्याचे सांगितले. बराच वेळ ती तिथेच उभी होती. बॅग घेण्यासाठी कोणीही न आल्याने अर्ध्या तासानंतर ती बॅग घेऊन घरी आली. तिने बॅग उघडून पाहिल्याचे सांगितले. आत दागिने आहेत हे तिला माहीत होते, पण तिने ते जसे आहेत तसे सोडून दिले. घरी आल्यानंतर पिशवीबाबत पालकांना माहिती दिली. तिचे वडील मंगल सिंग सोमवारी सकाळी रीना आणि बॅग घेऊन डॉ.बडकुरला यांच्या कडे पोहोचले. तेथून दागिन्यांनी भरलेली बॅग मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 
 
पोलीस आणि उदयपूरच्या स्थानिक लोकांनी रीनाचा सत्कार केला. दागिन्यांच्या  मालकाने आपल्या परीने रीनाचा 51 हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तसेच स्टेशन प्रभारी प्रकाश शर्मा यांनी रीनाचा त्यांच्या वतीने अकराशे रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला. स्थानिक नागरिक ब्रिजगोपाल लोया म्हणाले की, प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांचा आदर करणे आवश्यक आहे. हे लोकांना प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती