सरकारकडून ठोस आश्वासन, माल वाहतूकदारांचा संप मागे

शनिवार, 28 जुलै 2018 (08:57 IST)
गेले आठ दिवस सुरु असलेला माल वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलाय. माल वाहतूकदारांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तातडीने विचार केला जाईल, असे सरकारकडून ठोस आश्वासन केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मिळाल्यानंतर वाहतूकदारांनी संप मागे घेतला. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटरवरून माहिती दिली. 
 
सरकार वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे. त्यांच्या काही मागण्या आधीच मान्य करण्यात आलेल्या आहेत. अन्य मागण्यांवर विचार विनिमय करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 
 
दरम्यान, वाहतूकदारांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. म्हणूनच चालकांसह या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच वीमा तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी एक विशेष योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पंतप्रधान वीमा योजनेत ही योजना समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती