दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून आत्महत्या केली

सोमवार, 1 जून 2020 (11:57 IST)
पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात एका ज्येष्ठ डॉक्टरने अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या केली. नाक कान-घशातील 74 वर्षीय डॉक्टर जे.एस. अहलुवालिया यांनी बाथरूममध्ये गिझरच्या तारांना लपेटून आत्महत्या केली.
 
24 तासांहून अधिक वेळ त्यांनी त्यांचे गेट आतून लॉक केलेले पाहून शेजार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी दरवाजा तोडला असता वृद्ध व्यक्तीचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला.
 
त्यांची पत्नी आणि विवाहित मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. कुलूपबंदीनंतर वृद्ध एकटे राहत होते. शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ते एकाकीपणामुळे खूप व्याकुळ झाले होते. कदाचित म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचलले.
 
डॉक्टरांचे जवळचे नातेवाईक सध्या चंदीगडमध्ये राहतात आणि पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. त्याच्या आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी विकासपुरी पोलिस स्टेशनला कालपासून वृद्ध डॉक्टरचे दार बंद असल्याची माहिती मिळाली.
 
शेजार्‍यांनी अशी माहिती दिली की जेएस अहलुवालिया यांना शुक्रवारी संध्याकाळी अंतिम वेळी पाहिले होते. यानंतर ते दिसले नाही. पोलिस दार तोडून आत पोहोचले असता डॉक्टरचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला.
 
डॉक्टरांनी गिझरच्या तारा कापून घेतल्या आणि नंतर त्या हातात लपेटल्या. तपासादरम्यान डॉक्टरांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये असल्याचे पोलिसांना समजले आहे. नवरा-बायको ऑस्ट्रेलियात गेले, परंतु त्यांना तिथे आवडले नाही आणि ते भारतात परतले. त्यानंतर, इथे देखील ते एकटेच असल्याने अस्वस्थ झाले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती