लहान मुलांची अकाउंट्स बंद करा, गुगल, फेसबुक, ट्विटर आणि केंद्र सरकारला नोटीस

बुधवार, 20 मे 2020 (08:52 IST)
सोशल मीडियावरील लहान मुलांची अकाउंट्स बंद करण्यात यावीत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुगल, फेसबुक, ट्विटर आणि केंद्र सरकारला नोटीस धाडली आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयात सोशल मीडियावरील लहान मुलांची अकाउंट्स हटवण्यात यावी यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने 2013मध्ये सोशल साईट्सवर काही आदेश जारी केले होते. 13 वर्षे वयापेक्षा कमी वय असलेली मुले सोशल मीडियावर अकाउंट्स बनवू शकत नाहीत, असं त्या आदेशात म्हटलं होतं. पण, सोशल मीडिया साईट्सने त्या आदेशाचं गांभीर्याने पालन केलं नाही. त्यामुळे कमी वय असलेली मुलं कोणत्याही बंधनाशिवाय सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यातील काही गुन्ह्यांचे बळी पडत आहेत, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती