Sushant singh rajput death: सुशांतच्या कुटुंबावरील दु :खाचा डोंगर, त्याच्या भावाच्या पत्नीचे निधन

मंगळवार, 16 जून 2020 (09:21 IST)
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे निधन झाल्याचा धक्का त्यांच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याने या जगाला सोडले आहे.  मुंबईत सुशांत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात असताना, बिहारमध्ये राहणार्‍या त्याच्या भावाच्या पत्नीचे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, सुशांतच्या मृत्यूच्या  बातमीनंतर तिने खाणं पिणं सोडले होते.
 
चुलतभावाच्या पत्नीचा मृत्यू  
सुशांतची चुलतभावाची पत्नी सुधा देनी बिहारच्या पूर्णिया येथे राहत होती. सुशांतच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती आणि खाण पिणं ही  सोडले होते. अभिनेत्याच्या मृत्यूने तिला मोठा धक्का बसला होता. ज्या वेळी सुशांतला मुंबईत अंतिम निरोप देण्यात येत होता, त्या वेळी सुधाने पूर्णिया येथे अखेरचा श्वास घेतला. यामुळे कुटूंबावरील दु: खाचा डोंगर तोडला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती