त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी(टीएसएसी एस)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्रिपुरामध्ये 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉसिटीव्ह आढळले असून 47 मुलांचा मृत्यू झाला आहे. शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
एचआयव्ही हा एक धोकादायक आणि संसर्गजन्य आजार आहे. सध्या या आजाराने त्रिपुरातील विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. एचआयव्ही प्रकरणांमध्ये वाढ होण्यासाठी ड्रग्सच्या गैरवापराला जबाबदार धरून त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसीएस) ने म्हटले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये, श्रीमंत कुटुंबातील मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळले आहे. या आकडेवारीत अशी कुटुंबेही आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत आहेत आहे मुलांच्या मागण्या पुरवण्यात व्यस्थ आहे. त्यांच्या मुलांना अमली पदार्थाचे व्यसन लागतात. पालकांना समजेल तो पर्यंत वेळ निघून जाते.