सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता

बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (13:18 IST)
दिल्लीच्या न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे.
 
17 जानेवारी 2014 च्या रात्री सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. या प्रकरणात शशी थरूर हे आरोपी होते. दिल्ली पोलिसांनी आरोपीला आयपीसीच्या कलम 498 ए (पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून छळ) आणि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. थरूरवर मानसिक छळ आणि खुनाला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती