राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले होते. मात्र त्यात थोडी चूक झाली मग काय भाजपाने ती उचलून धरली होती. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.ही चूक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दाखवून देत प्रश्न विचारण्याआधी होमवर्क करा, असा सल्ला राहुल यांना दिला होता. तर दुसरीकडे ट्वीटमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं गणित चुकलं. यानंतर सोशल मीडियावर भाजपने राहुल गांधींची चूक दाखवून त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र राहुल यांनी लगेच चूक कबूल केली आणि भाजप आणि मोदींवर उपहासात्मक भाष्य केलं आहे. ते म्हणतात की "भाजपचे माझ्या सर्व मित्रांनो, मी नरेंद्रभाईसारखा नाही, तर एक माणूस आहे. आम्ही चुका करतो पण त्यामुळे आयुष्य आणखी रंजक होतं. चुकीकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार. कृपया यापुढेही असं करत राहा, यामुळे चूक सुधारण्यासाठी मला मदतच होईल. तुम्हा सगळ्यांना प्रेम,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपने ट्रोल केलेले ते ट्वीट भाजपवर येवून आदळले आहेत. राहुल यांनी चूक कबुल करताच सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे.
For all my BJP friends: unlike Narendrabhai, I am human. We do make the odd mistake and that’s what makes life interesting. Thanks for pointing it out and please do keep it coming, it really helps me improve. Love you all.