Queen Elizabeth II death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ भारतात एक दिवसाचा राजकीय शोक, सरकारने घोषणा केली

शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (16:01 IST)
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने शोक व्यक्त केला आहे.शुक्रवारी गृह मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून, सरकारने ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ रविवारी, 11 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला असल्याची माहिती देण्यात आली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. 
 
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शोकदिनी भारतातील सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.या दिवशी कोणतेही अधिकृत काम होणार नाही.
 
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ II यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले.त्या ब्रिटनमध्ये सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या होत्या .गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्या 96 वर्षांच्या होत्या.राणीने 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती