संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (21:06 IST)
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असून या अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला दिले आहेत. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात येतेय. मंगळवारी झालेल्या सुनावणीत त्यांची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
दरम्यान, संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. गुरुवारी या अर्जावर झालेल्या सुनावणीत विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीला निर्देश दिले आहेत १६ सप्टेंबरपर्यंत या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती