पुण्यातील मदरश्यातून सहा मुले बेपत्ता

शनिवार, 7 जुलै 2018 (10:01 IST)
पुणे येथील हडपसर भागातून मदरशातून सहा मुले बेपत्ता झाली आहे. त्यामुळे मोठी  खळबळ उडाली आहे. ही सर्व मुले मैदानावर खेळत होती, ही सर्व मुले शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर गेली, मात्र ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत. तीन जुलैपासून हे सर्व बेपत्ता झाली आहेत. प्रकरणी मोहम्मद अबु तालीब शब्बीर आलम शेख (वय २६) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील दारुल उलूम चिस्तीया जलालिया नावाच्या मदरशामध्ये ही मुले दाखल झाली. फिर्यादींनी मदरशात आधीपासून असलेल्या तीन मुलांसोबत त्यांना ३ जुलै रोजी संध्याकाळी जवळच्या मैदानात खेळायला नेले. सर्व मुले एक एक करत शौचालयात जायचे कारण देत बाहेर पडली. यानंतर ती मदरशामध्ये गेली, तेथून स्वत:चे सामान घेऊन कोणालाही काही न सांगता निघुन गेली. पोलिस या सर्वांचा शोध घेत असून नेमके काय कारण घडले असावे असा प्रश्न विचारात असून चौकशी सुरु केली आहे.
 
बेपत्ता झालेल्या मुलांची नावे : 
 
सहमद आसार उद्दीन रजा (वय १३), 
अन्ना महंमद आजाद शेख (वय १२), 
अहसान निजाम शेख (वय १५), 
शाहनवाज जमालुउद्दीन शेख (वय १६), 
अन्वारुल इसराइल हक (वय १३) 
रिजवान आलग सलमुद्दीन शेख (वय १५) 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती