PM Modi US Visit :आज पासून पंतप्रधान मोदी अमेरिकी दौऱ्यावर जाणार,वेळापत्रक जाणून घ्या
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (09:45 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहेत.या दरम्यान,पीएम मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतील.या तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत देशाचे मंत्री एस.जयशंकर,एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव शृंगला उपस्थित राहतील.या भेटीत, पीएम मोदी क्वाड देशांच्या बैठकीला उपस्थित राहतील, UNGAला संबोधित करतील. या दौऱ्यात जो बायडेन यांच्या भेटीपासून पंतप्रधान मोदी अनेक बैठकांचा भाग असतील.
मंगळवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी माहिती दिली आहे की 25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय महासभेला संबोधित करतील आणि त्यावेळी ते रिफॉर्म बद्दल बोलू शकतात.पंतप्रधान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरही आपली बाजू मांडतील आणि यावेळी ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंधांमुळे उद्भवणाऱ्या चिंतांवर चर्चा करू शकतात. या व्यतिरिक्त,पंतप्रधान क्वाड नेत्यांच्या सहभागावर बोलतील.
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतील.दोन्ही नेत्यांमध्ये अफगाणिस्तानमधील विकास, कट्टरतावाद, अतिरेकी आणि सीमा दहशतवाद रोखण्याच्या मार्गांवर प्रमुख चर्चा केली जाईल आणि याशिवाय भारत-अमेरिका जागतिक भागीदारीचा मुद्दाही प्रमुखपणे उपस्थित केला जाईल.
24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि बायडेन त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत आणि बहुआयामी बनवण्या संबंधित आढावा घेतील.
पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना भेटणार आहेत. या दरम्यान ते कमला हॅरिसशी औपचारिक संभाषण करतील. पीएम मोदींची ही भेट खूप व्यस्त असणार आहे.या दरम्यान ते अनेक लोकांना भेटतील.पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांचीही भेट घेतील.
याशिवाय, पीएम मोदी क्वाड देशांच्या बैठकीला उपस्थित राहतील.कोरोना बाबत जागतिक बैठकीत सहभागी होतील आणि अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भेटतील.