काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. या हल्ल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता जयेश दरजी याला अटक केली आहे.
काँग्रेस नेत्यांनीही या हल्ल्याप्रकरणी भाजपवर थेट आरोप केला आहे. मात्र भाजपने या आरोपांचं खंडण केलं आहे. राहुल गांधींवरील हल्ला हा जीवघेणा होता, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
गुजरातमधील बनासकांठा इथं राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. इतकंच नाही तर राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले.