लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (15:18 IST)
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. अशाप्रकारचा डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे. याआधी अशा रजिस्ट्रीचा वापर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयरलॅंड, न्यूझींलॅंड, दक्षिण आफ्रीका, त्रिनिदाद आणि टोबेगोसारख्या देश करत आहेत.या रजिस्ट्रीमध्ये आरोपीचं नाव, फोटोग्राफ, घरचा पत्ता, अंगठ्यांचे ठसे, डीएनए सॅम्पल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणार आहे. 
 
या डेटाबेसमध्ये 4.5 लाख केस असून एकच आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्यांची प्रोफाइल असणार आहे. यासाठी देशभरातील तुरूंगातून गुन्हेगारांच्या प्रोफाइल गोळा करण्यात आल्या आहेत. हा डेटाबेस नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB)कडे साठवला जाणार आहे. या माहितीचा उपयोग गुन्हे तपास यंत्रणेला करता येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती