कॉंग्रेसने पाटीदार नेता हार्दिक पटेलची मागणी मान्य केली आहे. कॉंग्रेस हार्दिक पटेलसोबत बोलणी करून आठ उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले की, हार्दिकने आरक्षणाच्या मागणीसोबतच ७-८ उमेदवारीची तिकीटे मागितली होती. ते म्हणाले, ‘हार्दिकची मागणी योग्य आहे. आम्हाला पाटीदार बहुल क्षेत्रात मजबूत उमेदवार उतरवण्यास काहीच अडचण नाहीये’ असे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे जिग्नेश मेवाणीने कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलिन होण्यास नकार दिला पण आम्ही कॉंग्रेसला समर्थन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले की, ‘मेवाणी यांनी दलित कल्याण आणि विकासासाठी काही खास मागण्या समोर ठेवल्या आहेत. ज्या कॉंग्रेसला मान्य आहे’. दुसरीकडे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी १० ते १५ उमेदवारांसाठी तिकीटे मागितली आहे.