प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच विधानसभेतील मार्शल्सकरवी कपिल मिश्रा यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर आरोप केल्यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कपिल मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आले.