अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज झालेल्या अतिरेक्यांनी पहाटे 1 च्या सुमारास इम्फाळ पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खामेनलोक भागात गावकऱ्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या क्षेत्राची सीमा मेईटी-बहुल इम्फाळ पूर्व जिल्हा आणि आदिवासीबहुल कांगपोकपी जिल्ह्याला लागून आहे.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील फुगाकचाओ इखाई येथे सुरक्षा दलांची कुकी अतिरेक्यांशी चकमक झाली. कुकी अतिरेकी मेईतेई भागांजवळ बंकर उभारण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला.
मणिपूरमध्ये महिनाभरापूर्वी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 310 जण जखमी झाले आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्याच्या 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू होता, तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
Edited by : Smita Joshi