काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुधवारी पूर्व वर्धमान येथील गोदार मैदानावर ममतांनी प्रशासकीय बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री कोलकात्याला परतण्यासाठी गाडीत बसल्या. सभेच्या ठिकाणाहून जीटी रोडवर चढत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्या फटक्यात मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला जखम झाली. मात्र ममता यांनी गाडी न थांबवता थेट कोलकात्याला रवाना झाल्या.
मुख्यमंत्र्यांनी कपाळावर रुमाल बांधला
एका प्रत्यक्षदर्शीनुसार, जखमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कपाळावर रुमाल बांधला होता. बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ममता बॅनर्जी यांनी सभेला सुरुवात केली. त्या हेलिकॉप्टरने पूर्व वर्धमानला पोहोचल्या, पण बैठक संपण्यापूर्वीच वातावरण खराब होऊ लागले. धुक्याबरोबरच पावसालाही सुरुवात झाली. त्याच क्षणी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने परतणार नाहीत, असे ठरले. रस्त्याने कोलकाता येथे जातील.